Wednesday, April 19, 2006

आमचा प्रेमदीन

आज खुप दिवसानी काहि लिहावयास वेळ मिळाला कारन कि १४ फ़ेब्रुवारी ला आमच्या हाती प्रेम पत्र भेट्ले आम्हाला वाट्ले कि बढती असेल मोठे खुश आम्हि उघडुन बघतो तर काय ! नौकरी वर गदा आलि होति,वेळ कठिन होती……… हाती प्रेम पत्र मिळाले होते सर्वाना कि आम्हि भारतीय केन्द्र बन्द करावयाचा निर्णय घेतला आहे वेळ कमि होता,आनी आमचे चेहेरे पाहण्यासारखे होते काय करनार ? लगेच शोध मोहीम हाती घ्यावी लागली. प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे होते आनी आम्हि तर नुकतेच आलो होतो ,आनखी नवे प्रश्न परेशान हैरान .... चागलीच फ़सली होती कोनाला बोलता पन येत नव्हते स्वत: ला च साभाळयचे होते ,उलट गिनती सुरु झाली होती १-१ दीवस जात होता प्रयन्त चालु होते ,अवघे ३ महीने झाले होते खुप आशा होत्या की आता स्थीर होवु पन काय... मनाचा कोड्मारा होत होता स्वप्न पन अपुर्न राहत होते, ऎवढे तरी बरे कि घरी कोनीच नव्हते त्यामुळे बरे वाट्त होते आनी घरी सागुन पन कशाला कोनाला त्रास. प्रयत्नाना यश आले मुलाखती होत होत्या २ च दील्या आनी त्यापैकी १ पक्की झाली ,इथे अस्तीत्व टीकवन्याचा प्रश्न होता त्यामुळे काही आढेवेढे न घेता हो म्हट्ले आनी त्यानी विचारले कि केव्हा येनार ?काय बोलनार ? म्हट्ले की १ ला च पन मी पुढील आठवड्यात रजा घेनार ,कारन आम्ही २८ वर्षा आधीच्या ईतीहासाची पुनरावुत्ती करनार आहे अहो आम्ही बाप बननार आहे ,तर ते बोलले आधी घरी जावा आणी बाळ बघुनच परत या.
घरी गेलो १५ दीवस राहलो आमच्या सुपुत्राचे ६ मार्च ला स्वागत केले, आज आम्ह्या सर्वाना नौकरी लागली आहे आनी ही गोष्ट खुप काही शिकवुन गेली आहे, आनी हो सागायचे विसरुन गेलो आम्ही ब्लोग शोध निकाल यन्त्राच्या कपनी त काम करत होतो :-)

0 Comments:

Post a Comment

<< Home